महाराष्ट्र
लोटेवाडी येथील ॲडव्होकेट शंकर सरगर व कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
सांगोला :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोटेवाडी येथील ॲडव्होकेट शंकर भगवान सरगर व त्यांचा असंख्य कार्यकर्त्यांनी गुरूवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने सांगोला तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.यावेळी लोटेवाडी व परिसरातील पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षात काम करण्याचा निर्णय ॲडव्होकेट शंकर भगवान सरगर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी या सर्वांचे स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन देवून सर्वांचे स्वागत केले.
लोटेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना लोटेवाडी भागतून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला.