महाराष्ट्र
मोठी बातमी….अपक्ष उमेदवाराचा शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा
सांगोला विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार यांनी डॅाक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी विधानसभेसाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घेत डॅाक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला.
यावेळी अपक्ष उमेदवार धनाजी दत्तात्रय पारेकर यांनी सांगितले की,आगामी विधानसभेच्या निवडणुकीत डॅाक्टर बाबासाहेब देशमुख यांचे ताकदीने काम करणार असून बाबासाहेब देशमुख हे कमीत कमी पन्नास हजार मतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.तसेच यापुढील काळात शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी डॉ बाबासाहेब देशमुख यांनी धनाजी पारेकर यांच्या निर्णयाचे स्वागत करून शेतकरी कामगार पक्षात आपणास योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे आश्वासन दिले.