महाराष्ट्र

शेकापच्या विजयाची शाश्वती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश..

 

सांगोला :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यलमार मंगेवाडी येथील येथील शिवसेना उबाठा व भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी प्रवेश केला आहे. डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा झाला.

यलमार मंगेवाडी येथील उबाठा गटातून संजय भडंगे, संजय भडंगे, लक्ष्मण जावीर आणि बाळासाहेब दादासो कोकरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा मधून शेतकरी कामगार पक्ष्यांमध्ये जाहीर प्रवेश केला.

नवीन पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेना उबाठा व भाजपा च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकाप मध्ये प्रवेश केला. उबाठा व भाजपा च्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना यलमार मंगेवाडी गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार शेकाप मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे त्यामुळे जनता प्रस्थापितांना वैतागलेले असून त्यामुळे शेतकरी कामगार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. शेतकरी कामगार पक्षाने गेल्या पाच वर्षाच्या काळात अनेक गोष्टींना वाचा फोडला आहे गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी आंदोलने ही केली आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!