हटकर मंगेवाडीत शहाजीबापूंना धक्का ; असंख्य कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी येथील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि त्यांच्या कामाची तडफ व जनसंपर्क यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, उध्दव ठाकरेंची शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक विचारधारा आणि परिवार आहे सर्वसामान्यांना विकासासाठी एकसमान न्याय देण्याचे काम केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी मशाल हाती घेतली यापुढील काळात तुमच्या अपेक्षांना तडा जाणार नाही असेही यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर सांगोल्यात शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आणि दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी येथील आमदार शहाजीबापू पाटील यांचे कट्टर समर्थक अनिल अशोक भुसनर, संभाजी रखमाजी पाटील, शरद दादू भुसनर, तानाजी संपत वाघे, विजय नामदेव शेळके, तुकाराम बलभीम डोरले या कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील, योगेश खटकाळे, कमरूद्दिन खतीब, शिवसेना शहरप्रमुख तुषार इंगळे, गोरख येजगर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.