जवळा परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
सोलापूर जिल्ह्याचे नेते दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर सांगोल्यात शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची रांगच लागली आहे. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा अभेद्य गड अशी ओळख असणाऱ्या जवळा परिसरात दिपकआबांची ताकद वाढतच चालली आहे. तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशांचा धडाका सुरू आहे. जवळा, तरंगेवाडी भोपसेवाडी, बुरंगेवाडी, आगलावेवाडीतील कार्यकर्त्यांचा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करून पुन्हा एकदा सांगोला विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला.
दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेकांचे पक्षप्रवेश धडाक्यात सुरू आहेत. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे पक्ष संघटन अधिक मजबूत स्थितीत उभे राहिले आहे. सांगोला तालुक्यातील जवळा, तरंगेवाडी भोपसेवाडी, बुरंगेवाडी, आगलावेवाडीतील कार्यकर्त्यांचा येथील संतोष मळगे, अरविंद बुरंगे, नंदू मेटकरी (मेंबर), चंदू खांडेकर, बिरा कोळेकर, आबा मागाडे, संतोष बुरंगे, बलभीम मागाडे, तात्या खांडेकर, युवराज मळगेबिरा खांडेकर, म्हाळु बुरंगे, गणेश हालगंडे, आविनाश मागाडे बाबू मागाडे, श्रीमंत मोचे, सौरभ मागाडे, गोरख मागाडे, रोहित सुर्वे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हातात घेतली आहे. यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांचे समर्थक व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित उपस्थित होते.