
राजे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
राजे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक संभाजी कोकरे सर यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी श्री रणदिवे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक काटे सर, सर्व शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री रणदिवे सर यांनी केले.