चोपडी येथे श्री सिद्धनाथ  यात्रेनिमित्त 21 ते 23 मे दरम्यान विविध कार्यक्रम व स्पर्धेचे आयोजन

सांगोला/ प्रतिनिधी( दशरथ बाबर) : चोपडी तालुका सांगोला येथे मंगळवार दिनांक 21 मे ते गुरुवार दिनांक 23 मे 2024 या कालावधीत श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .यात्रेचे हे दुसरे वर्ष असून विविध कार्यक्रम ,स्पर्धा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा  लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व चोपडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त मंगळवार दि. 21 मे रोजी रात्री 8 वाजता प्रख्यात व्याख्याते अविनाश भारती, छत्रपती संभाजी नगर यांचे व्याख्यान होणार आहे. बुधवारी रात्री 8 वाजता प्रसिद्ध महिला कीर्तनकार सौ. रोहिणीताई परांजपे पुणे यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवारी रात्री 8 वाजता प्रसिद्ध महिला कीर्तनकार रूपालाताई सवणे, परभणी यांचे  कीर्तन होणार आहे.
मंगळवार २१मे रोजी सकाळी ९.०० वाजता रांगोळी स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी बक्षीस अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 2101 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1501 रुपये ,तृतीय क्रमांकासाठी 1001 रुपये असे बक्षीस असून ही बक्षीसे राजुशेठ भोसले संगमनगर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता संगीत खुर्ची  स्पर्धा मुली व महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यासाठी बक्षीसे अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 1101 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 701 रुपये व तृतीय क्रमांकासाठी 501 रुपये  देण्यात येणार असून हे बक्षीस  संजीवनी मेडिकलचे,नवनाथ डोंगरे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. लिंबू चमचा स्पर्धा मुली व महिलांसाठी  आयोजित केली असून ग्रामपंचायत सदस्य अनिल जगदाळे यांच्या वतीने प्रथम क्रमांकासाठी 1101 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे .द्वितीय क्रमांकाचे  701 रुपयांचे बक्षीस डॉ. दीपक विजय बाबर यांच्या वतीने देण्यात येणार आहे.  तृतीय  क्रमांकाचे  501रुपयांचे बक्षीस  डॉ. अमित पांडुरंग बाबर यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
बुधवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 9 वाजता स्लो बाइक स्पर्धा मुले व पुरुषांसाठी आयोजित केली आहे. तसेच संगीत खुर्ची स्पर्धा मुले व पुरुषांसाठी आयोजित केली आहे व लिंबू चमचा स्पर्धा मुलांसाठी आयोजित केली आहे .या सर्व स्पर्धेसाठी बक्षीस अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी 1001 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 701रुपये, तृतीय क्रमांकासाठी 501 रुपये बक्षिस  देण्यात येणार असून ही सर्व बक्षिसे संकेत हार्डवेअर चोपडीचे आबासो बाबर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत .तर संगीत खुर्चीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1101 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी  701 रुपयांचे बक्षीस ,तृतीय क्रमांकासाठी 501 रुपयांचे बक्षीस यश दूध संकलनचे जनार्दन बाबर सर यांच्यातर्फे देण्यात येणार आहेत. लिंबू चमचा मुलांच्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1001 रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 701रुपये तृतीय क्रमांकासाठी 501 रुपयांचे  बक्षीस  श्रीराम संकलन केंद्र चोपडीचे आगतराव चव्हाण यांच्या तर्फे देण्यात येणार आहेत .
    गुरुवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 9, नऊ वाजता खिलार पशुधन प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सजवलेली खिलार बैलजोडी व गाडीसाठी प्रत्येकी 1011 रुपयांची उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट खिलार वळूसाठी 2100 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. उत्कृष्ट खिलार गाईसाठी 2100 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. ही सर्व बक्षिसे राजुशेठ भोसले संगमनगर यांच्यातर्फे देण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button