इनर व्हील क्लब ऑफ सांगोला यांच्या वतीने रामकृष्ण व्हिला कार्यालयात लावण्यात आले स्लोगन बोर्ड

सांगोला (प्रतिनिधी):- ईनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने रामकृष्ण व्हिला गार्डन लग्न कार्यालय वाडेगाव रोड येथे अन्न वाचवा ,व पाणी वाचवा असे जेवणाच्या हॉलमध्ये, व पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्लोगन बोर्ड लावण्यात आले .या बोर्डचे उद्घाटन कार्यालयाचे मालक श्री. पांडुरंग पाटील. व सौ. सुनिता पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यालयामध्ये जेवणासाठी जे पण लोक जेवण करतील त्यांनी स्लोगन पाहून थोड्याच प्रमाणात जेवण घेऊन वेस्ट न करता त्यांच्याकडून अन्नाची नासाडी होऊ नये. म्हणून हा ब्रॅण्डिंग प्रोजेक्ट घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री.संजय पांडुरंग लाटणे भाऊ . क्लब अध्यक्ष सौ. सविता लाटणे. एडिटर संगीता चौगुले, सुशीला नांगरे, विजया खरतडे ,उपस्थित होत्या.
हा प्रोजेक्ट कार्यालयाचे मालक पांडुरंग पाटील यांना खूप आवडल्यामुळे, इनरव्हील क्लबचे, प्रोजेक्ट राबवल्याबद्दल .शेवटी कार्यालयाच्या वतीने पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. व इनरव्हील क्लबच्या कामाचे कौतुक केले.