जुनोनीचे डॉ. ज्ञानेश्वर कोंडीबा सरगर – पाटील यांचे निधन…

कोळा वार्ताहर :-सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील स्वर्गीय आ भाई गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर कोंडीबा सरगर – पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले
निधना समयी त्यांचे वय ८८ वर्ष होते.ते मनमिळावू स्वभावाचे होते त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
सांगोला येथील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्रा डॉ. भूपाल उर्फ दिपक पाटील सरगर व प्रगतशील बागायतदार प्रकाश सरगर पाटील यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सूना नातवडे जावाई असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या तिसरा सोमवारी दिनांक २० मे रोजी सकाळी आठ वाजता श्रीराम वस्ती जुनोनी येथे घराजवळ होणार आहे.