इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड परीक्षेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचे घवघवीत यश.

इंटरनॅशनल पातळीवरील सायन्स ऑलिंपियाड फाऊंडेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाडमध्ये सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. या इंग्लिश विषयासाठी 97विद्यार्थी या परीक्षेस बसले होते.यामध्ये कु.श्रुती दिलीप फुंडे इ. 1ली व कु. तन्वी अभिजीत नलवडे इ. 1ली यांनी मेडल ऑफ डिस्टींक्शन मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांना सां.ता.शि.प्र.मंडळाचे सचिव श्री.म.शं.घोंगडे सर व कोळा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री.ना.म.विसापुरे यांच्या हस्ते गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विभागप्रमुख कु.आरती फुले व मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थासचिव श्री.म.शं.घोंगडे सर यांच्या हस्ते कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला.या निमित्ताने श्री.विसापुरे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सध्या तंत्रज्ञानामुळे आपणास माहितीचा साठा भरपूर उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा व भरपूर ज्ञान संपादन करावे आणि अशा बाह्यस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे हे सांगून विद्यार्थी व विद्यालयाचे शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले.
या परीक्षेत 22 विद्यार्थ्यांनी मेडल ऑफ एक्सलन्स पटकावले.
यामध्ये इ.1लीतील कु.आर्या रणजित चव्हाण,कु. अरिबा फतिमा अमीर मुलाणी, स्वरा योगेश साळुंखे, काव्यांजली कुलदिप घोंगडे इ. 2रीतील कु.आरोही अमोल ढेरे, रितीशा प्रवीण बनसोडे, विहा शरद पवार इ. 3रीतील सिध्दी सुनील जाधव, आरोही प्रवीण भोरकडे, वेदांतिका विश्वास जाधव, युगंधरा विश्वजित देशमुख इ.4थीतील ईश्वरी आप्पासाहेब बाबर, जानव्ही रविकिरण चव्हाण, उमाप्रिया उत्तम ढोले, कणव श्रीरंग लोखंडे, आराध्या सचिन म्हमाणे, समीक्षा पवनकुमार नेहरकर,वैष्णवी संतोष सुरवसे तसेच इ. 5वीतील आर्या अशोक बाबर, समर्थ विजय थिटे, विराज सचिन पाटील व इ. 6वीतील काव्या मुकेश शर्मा या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लता देवळे यांनी केले तर पल्लवी थोरात यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर, सहसचिव श्री.प्रशुध्दचंद्र झपके साहेब तसेच सर्व संस्थासदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.