सांगोला(प्रतिनिधी):शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने पुणे विभागाचे वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी मच्छिंद्र गळवे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रामुख्याने कोल्हापुरातून सोलापूरला जाण्याकरता सकाळच्या 7-8 या वेळेत रेल्वे सेवा सुरू केल्यास मिरज, सलगरे ,कवठेमंकाळ ,ढालगाव सांगोला येथील नागरिकांना पंढरपूर सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर या ठिकाणी जाण्याकरिता रेल्वे सुरू करावी यामुळे या भागातील लोकांना कार्यालयीन वेळेत सोलापूर , व धार्मिक स्थळी भेटी देऊन परतीच्या प्रवासाकरता सायंकाळी 5 वाजता कलबुर्गी ते कोल्हापूर अशी रेल्वे सेवा सुरू करावी, कोल्हापूर – सोलापूर -हैदराबाद रेल्वे सेवा सुरू करावी,कोल्हापूर ते कलकत्ता, कोल्हापूर -पंढरपूर -तिरुपती रेल्वे सुरू करावी. कुर्डूवाडी- मिरज रेल्वेचा विस्तार कोल्हापूर पर्यंत करावा तसेच लातूर मिरज कोल्हापूर या मार्गावरील पुणे अंतर्गत येणारे रेल्वे दुहेरीकरणाचे काम ही तात्काळ सुरू करावे. दुहेरीकरणापर्यंत मिरज ते कुर्डूवाडी मार्गावरील क्रॉसिंग पॉइंट वाढवावेत
यावेळी अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
—————————————