हबिसेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील हबिसेवाडी येथील रासप ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,शेतकरी कामगार पक्ष या पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दिलीप उत्तरे, दत्ता उत्तरे, विलास उत्तरे ,रघुनाथ उत्तरे ,तानाजी उत्तरे ,यशवंत उत्तरे, पांडुरंग उत्तरे, ज्ञानेश्वर उत्तरे ,सुभाष उत्तरे, संतोष उत्तरे, महादेव उत्तरे, राहुल उत्तरे, तातोबा उत्तरे, संजय उत्तरे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे .
यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, निवडणूक अटी तटीची असून निवडणुकीत धनुष्यबाण हे आपले चिन्ह आहे. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदान कसे करता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. कार्यकर्त्यांच्या अडचणी प्रसंगी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन बापूंनी दिले. आहे. तर कार्यकर्त्यांनी बापूंचे आशीर्वाद घेऊन आजपासून प्रचार यंत्रणेमध्ये आपण झोकुन देऊन काम करू असे सांगितले. तसेच अधिकाधिक मतदान कसे करता येईल या दृष्टीने आपण प्रामाणिकपणे अहोरात्र काम करू व आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणु विश्वास व्यक्त केला.