हातीद गावच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. संगीता घाडगे यांची बिनविरोध निवड

सांगोला /प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील हातीद गावच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. संगीता बबन घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी ग्रामसेवक नरळे व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बरबडे पाटील मॅडम यांनी पार पाडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व गावातील मान्यवरांनी नूतन सरपंच संगीता घाडगे यांना शुभेच्छा दिल्या.
हातीद गावच्या नूतन सरपंच संगीता बबन घाडगे यांचा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय सांगोला येथे यथोचित सन्मान करून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी प्रदीप घाडगे, कुलदीप घाडगे, संतोष कोळी, तानाजी घाडगे, संभाजी चव्हाण, भाऊसो घाडगे ,सूर्यकांत घाडगे ,संजय केदार, अशोक घाडगे ,नानासो घाडगे ,गणेश घाडगे, आदिनाथ घाडगे, सुरज घाडगे, विकास घाडगे, वैभव घाडगे, प्रतीक घाडगे, मयूर घाडगे ,नामदेव घाडगे, राजकुमार कदम , प्रदीप ब घाडगे, प्रवीण घाडगे, राहुल घाडगे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नूतन सरपंच संगीता घाडगे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.



