महाराष्ट्र

मानेगाव येथील शेकाप कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

 

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

 

त्यानंतर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत.

 

सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत भारत मोरे, तानाजी बाबर, बाबासाहेब बाबर, भारत पाटील, मधुकर बाबर, उध्दव बाबर, दादासो बाबर, दगडु बाबर, मधुकर भजनावळे, नितीन बाबर, माणिक आण्णा बाबर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button