महाराष्ट्र

फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज ची उजनी धरणास शैक्षणिक भेट

सांगोला: सोलापूर जिल्ह्यात अभियांत्रिकी क्षेत्रात नावाजलेल्या फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मधील डिप्लोमा सिव्हिल विभागाने नुकतीच उजनी धरणास शैक्षणिक भेट दिली. या अगोदर महाविद्यालयाने कोयना ,राधानगरी यासारख्या मोठ्या धरणास भेट देऊन धरणाची सविस्तर माहिती विद्यार्थ्याना दिली होती.या अनुषंगाने द्वितीय व तृतीय वर्ष सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी उजनी धरणाच्या शैक्षणिक भेटीचे आयोजन केले होते.सत्तर च्या दशकात निर्माण झालेल्या व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदाइनी ठरलेल्या या धरणाची इत्तमभूत माहिती देताना उपयुक्त पाणीसाठा ,मृत पाणीसाठा,उपलब्ध टक्केवारी ,ओळिताखाली येणारे क्षेत्र इत्यादी बाबींची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.शाम कोळेकर व क्षेत्रभेट समन्वयक प्रा.शीतल पाटील यांच्यासह प्रा.शरद पवार,प्रा.मारुती भोसले,प्रा.संतोष चोथे,प्रा.सोनाली जगदाळे,सहाय्यक श्रीपती सातपुते व ४८ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.
ही शैक्षणिक भेट संस्थेचे चेअरमन मा.श्री भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली ‎.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button