महाराष्ट्र

सोमेवाडीत शेकापला धक्का, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

 

शेतकरी कामगार पक्षातील मनमानी कारभाराला तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून सांगोला तालुक्यातील सोमेवाडी येथील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

 

शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सांगोला तालुक्यातील सोमेवाडीत शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे. सोमेवाडी येथील संतोष जयवंत खरात, मयूर सुखदेव नरळे, नाथा नाना गवंड, संभाजी शिवाजी खरात, ओंकार खरात, प्रेम डुकरे, आनंद गोडसे, समाधान हणमंत गोडसे, युवराज महादेव खरात, शंकर नरळे, सिध्दनाथ नारायण गळवे या शेकापच्या कार्यकर्त्यांनी शेकापला रामराम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना सोमेवाडी गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button