महाराष्ट्र

फॅबटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत ५ दिवशीय कार्यशाळा संपन्न

सांगोला : येथील  फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत ‘हँड्स-ऑन सॉलिड वर्क्स’ या विषयावर पाच दिवशीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.राहुल आवताडे यांनी दिली.

“हँड्स-ऑन सॉलिडवर्क्स” या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडिकॅड ग्राफिक डिझायनरचे संचालक श्रीयश मुळे उपस्थित होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्ष व बी.टेक फायनल वर्षातील विद्यार्थ्यांना व्यावहारिक कॅड डिझाइन कौशल्यांसह सक्षम बनवत असते .त्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामार्फत विविध विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात येत असते, असे फॅकल्टी को-ऑर्डिनेटर प्रा.व्ही.एस.जाकुकोरे यांनी सांगितले.

 हि कार्यशाळा फॅबटेक चे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग  डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर,व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर , कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली व डीन ॲकॅडमिक डॉ. शरद पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा.राहुल आवताडे, प्रा.प्रियांका पावसकर, प्रा.संजय पवार यांच्या सह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे सर्व प्राध्यापक उपस्थितीत होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button