नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत साजरा करावा- पो.नि.अनंत कुलकर्णी; नाझरे ता सांगोला येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

नाझरे (प्रतिनिधी):-आगामी येणारा गणेशोत्सव सण हा सर्व गणेश मंडळांनी व नागरिकांनी आनंदात व उत्साहात साजरा करून त्याचे पावित्र्य व मांगल्य राखून शासकीय नियमांचे पालन करून शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी नाझरे ता सांगोला येथे शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करून सर्वांना संघटित केले व यामधून समाज प्रबोधन घडविले व यासाठी सर्व गणेश मंडळांनी आपली परंपरा सर्व धर्म समभावाची आहे व त्याचे जतन करण्यासाठी डीजे मुक्त तसेच ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवून पारंपारिक वाद्य वाजवून आपापले सण आनंदात साजरे करा व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.नियमांचे उल्लांघन करणार्यांवर आपण कठोर कारवाई करू व यासाठी पोलिसांना सहकार्य करा व शांतता एकोपा राखून उत्सव शांततेत पार पाडा असेही पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीस नाझरे पोलीस स्टेशन हद्दीत या अगोदर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व यापुढेही सर्व मंडळांनी काळजी घेऊन डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून शांततेत करा व नियमांचे पालन करा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद यांनी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांचा सत्कार पत्रकार रविराज शेटे सर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सायंकाळी चौकात दारू पिऊन धिंगाणा करतात त्यांचा बंदोबस्त करावा असे मत सामाजिक कार्यकर्ते दादासो हरिहर यांनी व्यक्त केले व तसेच सर्व मंडळांची मिरवणुकी संदर्भात चार दिवस अगोदर बैठक घेण्याचे ठरले.
सदर प्रसंगी नवनाथ बनसोडे, मा.सरपंच प्रसाद शिंदे, उपसरपंच समाधान शिंदे, माजी उपसरपंच गणीसो काझी, शशिकांत पाटील, पोलीस हवालदार अनिल बनसोडे, संजय भानवसे, आप्पासो पवार, माने शंकर ,संग्राम, राज योगी ,माऊली, सरगर वाडी, बनसोडे वाडी येथील मंडळाचे अध्यक्ष व सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी नंदकुमार रायचुरे यांनी सर्वांचे आभार मानले.