महाराष्ट्र

डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सन्मानित 

सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशनच्या वतीने माजी राष्ट्रपती व ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.

या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, २७ जुलै २०२५ रोजी द्वारकाधीश मंदिर सभागृह, सोलापूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांना डॉ.कलाम यांच्या समवेत काम केलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक नगरकर यांचे शुभहस्ते डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा.झपके यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी योगदानाची दखल घेऊन हा गौरव प्रदान करण्यात आला.

ड्रीम फाउंडेशन ही संस्था दरवर्षी राष्ट्र उभारणीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डॉ. कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रेरणा पुरस्कार प्रदान करते. शिक्षण, युवा मार्गदर्शन, सामाजिक सेवा व नवोपक्रम आदी क्षेत्रातील कार्यास प्रोत्साहन देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

प्रा. झपके सरांना मिळालेल्या या सन्मानामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button