जि. प. गणेश नगर शाळेत “रानभाजी महोत्स”वाचे आयोजन

नाझरा ( वार्ताहर): – श्रावण मासाची सुरुवात होता शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेचे औचित्य साधून दि. 26/7/2025 रोजी चोपडी केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेश नगर शाळेमध्ये ”रानभाजी महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले होते.
श्रावण महिन्यात पाऊस झाल्यानंतर सर्वत्र हिरवळ झालेली असते.या हिरवळीतील गवतामध्येच विविध रानभाज्या असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतात या भाज्या खाण्याची आवड मुलांमध्ये लहानपणापासूनच निर्माण व्हावी व आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारावी या उद्देशाने हा उपक्रम शाळेमध्ये घेण्यात आला. विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी त्यांच्या परिसरात असणाऱ्या भाज्या ठरवून दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी भाज्या आणून त्यांचे योग्य प्रकारे प्रदर्शन मांडले. तांदळ, चिघळ, घोळ, माठ, काटेमाठ, दगडी, हदगा, आघाडा, अळू, कुंजीर, पाथरी, कडवंची, शेपू, मेथी, कोथिंबीर, शेवगा, चिंच, उंबर, कासोदा, चाकवत, आंबट चुका, करडई, राजगिरा, हरभरा, अंबाडी, वाघाटी यासारख्या जवळपास 30 रानभाज्यांची ओळख व माहिती गणेश नगर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रूपाली पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. सदर प्रदर्शनास भेट देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तात्यासो बाबर, पालक धर्मेंद्र बाबर, दत्तात्रय बाबर, महेश बाबर, सिद्धेश्वर बाबर, सचिन वाघमारे, शिवाजी बाबर, गणेश खंडागळे तसेच, शितल खळगे, सोनाली खळगे, छाया खळगे, उज्वला मेखले, सुवर्णा खंडागळे, दिपाली बाबर, गायत्री बाबर, महिला पालक, अंगणवाडी सेविका विजया मेखले मॅडम उपस्थित होते.



