बुरलेवाडी (मेडशिंगी) येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये प्रवेश..

सांगोला :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुरलेवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी गुरुवार दि.7 रोजी प्रवेश केला आहे. डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा झाला.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी शेकापमध्ये प्रवेश केलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे स्वागत करत सर्व सामान्य जनतेच्या विश्वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त करत सर्वांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे सांगत यापुढील काळात तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.
शेकापच्या विजयाची खात्री झाल्याने बुरलेवाडी (मेडशिंगी) येथील असंख्य कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकाप मध्ये प्रवेश केला. तरुण व युवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मेडशिंगी परिसरातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार शेकाप मध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये जो अनागोंदी कारभार सुरू आहे त्यामुळे जनता प्रस्थापितांना वैतागलेले असून त्यामुळे शेतकरी कामगार पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. शेतकरी कामगार पक्षाने गेल्या पाच वर्षाच्या काळात अनेक गोष्टींना वाचा फोडला आहे.गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी आंदोलने ही केली आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणार्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.