सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचे मुंबई रंगोत्सव सेलिब्रेशन सेकंड लेवल मध्ये घवघवीत यश

मुंबई रंगोत्सव सेलिब्रेशन सेकंड लेवल मध्ये सुयश संपादन करणारया विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेजच्या उपप्राचार्या शहिदा सय्यद यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री.उदय बोत्रे, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मुंबई रंगोत्सव सेलिब्रेशन यांच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या कलरिंग कॉम्पिटिशनमध्ये विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या लेवलमध्ये 621 जणांनी सहभाग नोंदवला होता यामधून 89 विद्यार्थ्यांची सेकंड लेव्हल मध्ये निवड झाली होती .यामधून 24 विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले व नॅशनल लेव्हल थर्ड रँक, नॅशनल लेवल आर्ट मेरिट होल्डर आणि नॅशनल गोल्ड मेडल मिळवले तसेच आकर्षक भेटवस्तू पटकावल्या.
या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षिका कु.पल्लवी थोरात मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लता देवळे यांनी केले.
संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके,संस्थासचिव श्री. म. शं. घोंगडे, सहसचिव श्री. प्रशुध्दचंद्र झपके, खजिनदार श्री. शं. बा. सावंत, कार्यकारिणी सदस्य श्री.विश्वेश झपके यांच्यासह सर्व संस्था सदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.