सांगोला विद्यामंदिरचा अश्विन खांडेकर आंतरराष्ट्रीय स्केटिंगस्पर्धेसाठी श्रीलंकेत खेळणार; पणजी ( गोवा ) येथील राष्टीय स्पर्धेतून झाली निवड
सांगोला ( प्रतिनिधी ) रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया व रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात स्केटिंग चषक २०२४ साठी मिरामार बीच पणजी, गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमधून सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील अश्विन संजय खांडेकर इयत्ता ११वी शास्त्र या खेळाडूंची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ४०० मी.रेस १ व रिले १,२ स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशस्वी खेळाडूचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, व उपस्थित क्रीडा शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या .
या यशस्वी खेळाडूला क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा. डी.के पाटील,नरेंद्र होनराव,सुभाष निंबाळकर,प्रा.संतोष लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,सर्व संस्था सदस्य, पर्यवेक्षक बिभीषण माने,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूला शुभेच्छा दिल्या.