पेन्शन धारकांची दिवाळी अंधारात; सांगोला तालुक्यातील 1300 पेन्शनर व कुटुंब निवृत्ती वेतनधारकातून तीव्र संताप

सांगोला (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाने पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली परंतु सोलापूर जिल्हा परिषदे कडील इतर सामान्य प्रशासन व शिक्षण पेन्शनधारकांना अद्याप पेन्शन दिली नाही त्यामुळे पेन्शन धारकांना मात्र दीपावली आनंदात साजरी करता आली नाही.
नियमित दरमहाची पेन्शन फारच उशिरा दिली जाते. 10 ते 15 तारखेपर्यंत पेन्शन मिळते. अनेक वेळा संघटनेकडून मागणी करून पेन्शन अदालत मध्ये मागणी करूनही पेन्शन बाबत गांभीर्याने विचार होत नाही.
सांगोला तालुक्यातील 1300 पेन्शनर व कुटुंब निवृत्ती वेतनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण विभागाचे पेन्शन बाबतचे धोरण उदासीन आहे. पेन्शन 1 ते 5 तारखेला व्हावी, अशी मागणी संघटनेकडून होत आहे. जिल्हा परिषदेस वेळेत पेन्शन देणे शक्य नसल्यास कोषागर यांचेमार्फत मदत मिळावी अशी मागणी पेन्शनर्स कडून होत आहे.
पेन्शन बाबत विचारणा झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे सांगोला तालुका पेन्शन संघटनेचे अध्यक्ष समाज भूषण प्रभाकर कसबे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे मागणी केल्याचे सांगितले.