नगर वाचन मंदिर, सांगोला तर्फे आवाहन

नगर वाचन मंदिर, सांगोला तर्फे आवाहन
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरातील व परीसरातील सर्व सुज्ञ वाचकांना नगर वाचन मंदिर सांगोला एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उत्तम आणि दर्जेदार असे दिवाळी अंक आपणास वाचनासाठी उपलब्ध करून देत आहोत.
या दिवाळी अंक वाचनासाठी फक्त 50/- रू. वर्गणी असेल. 50 / रू मध्ये एक अंक आपणास वाचण्यास मिळेल आणि त्यानंतर पहीला अंक वाचून झाल्यास तो जमा करून दुसरा अंक मिळेल त्यासाठी दुसरी वर्गणी भरण्याची आवश्यकता नाही. अशा रितीने वाचकांच्या आग्रहास्तव फक्त वाचकांसाठी ही दिवाळी अंक वाचन योजना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरू करत आहोत, तेव्हा जास्तीत जास्त वाचकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था सेक्रेटरी श्री.मि.दा.फाळके सर यांनी केले आहे.