ग्रामपंचायत सदस्या संगीता घाडगे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना दररोज शेकापला मोठे झटके बसत असल्याचे दिसून येत आहेत. शेकापच्या नेतृत्वावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास नसल्याने तसेच शेकाप मधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत. नराळे गावात शेकापला भगदाड पडले असून विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संगीता कुमार घाडगे यांनी दिपकआबांना पाठिंबा देत शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.
शेतकरी कामगार पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत सांगोला तालुक्यातील अनेक गावे, वाड्यावस्त्यांवरील शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
नराळे गावात शेकापला मोठा झटका बसला असून विद्यमान ग्रामपंचायत सदस्या संगीता कुमार घाडगे, कुमार मनोहर घाडगे, रामचंद्र नामदेव घाडगे, काशीबाई मनोहर घाडगे, मनोहर एकनाथ घाडगे, रोहित कुमार घाडगे, रोहन कुमार घाडगे, बाळू वसंत घाडगे, राजू गुंडाप्पा शिंदे, युवराज बाबासो शिंदे, प्रकाश बाबासो शिंदे, मंगेश प्रकाश शिंदे, समाधान शिवाजी नलावडे, रामचंद्र बाबू जाधव, शिवाजी शंकर घाडगे, सुखदेव शंकर घाडगे, गणेश महादेव घाडगे, हरिबा धोंडीराम घाडगे, गणेश सुखदेव घाडगे, अतुल तानाजी नलावडे, सुनील बाळासाहेब भोसले, समाधान आबासो भोसले, संतोष शिवाजी शिंदे, संतोष आबासाहेब भोसले, सचिन भाऊसाहेब निकम, माणिक हिरा भोसले, सचिन माणिक भोसले, लक्ष्मण धोंडीराम पवार, समाधान धोंडीराम पवार, नानासो धोंडीराम पवार, बाबासो नारायण घाडगे, महेश बाबासो घाडगे, अक्षय दऱ्याप्पा जगधने, रंगनाथ निवृत्ती भोसले, ज्ञानेश्वर महादेव गेजगे, तानाजी महादेव जमदाडे, रामचंद्र निवृत्ती भोसले, खंडू मऱ्याप्पा जगधने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.