महाराष्ट्र

जनरल निरीक्षक श्री.सुबोधकुमार यांची दुसरे रॅडमयझेशन साठी भेट”

दिनांक 9/ 11 /24 रोजी सांगोला 253 विधानसभा मतदारसंघात दुसरे रँडमयझेशन साठी माननीय सुबोधकुमार यांनी भेट दिली असता तहसील कार्यालय सांगोला येथे ही प्रक्रिया दुपारी चार वाजता पार पडली यावेळी मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे बीयु , सीयु व व्हीव्हीपॅट मशीन रँडम पद्धतीने यादृच्छित करण पद्धतीने निवड करण्यात आली आहे

सांगोला तालुक्यात एकूण 309 मतदान केंद्र असून त्यापैकी चार केंद्र 32A,239A, 240A व 241A हे सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत या साठी आपल्याकडे मतदानासाठी 372 बी यु 372 सी यु व 402 व्हीव्हीपॅट मशीन प्राप्त झालेल्या आहेत आणि एकूण 63 मशीन या रिझर्व ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी यांनी सादर केली व एकूण 14 उमेदवार नोटा धरून अधिकृत करण्यात आले आहेत

रॅडमायझेशन प्रक्रियेचे वेळी उमेदवार आणि उमेदवाराची प्रतिनिधी खालील प्रमाणे उपस्थित होते 1) कुंदन फुलचंद बनसोडे- बीएसपी 2) दादासो मारुती बाबर- शेकाप 3)एकनाथ हनुमंत शिंदे -अपक्ष 4) सोमेश्वर रेवनसिद्ध यावलकर- शिवसेना शिंदे गट 5)दत्तात्रय बाळासाहेब गायकवाड हे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते यावेळी माननीय सुबोधकुमार, निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे उपस्थित असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button