महाराष्ट्र

बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

 

समाजातील सर्व वंचित व उपेक्षित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणणार असून, समाजातील दुर्लक्षित असलेल्या वंचित, गोरगरीब, दीन-दलित बांधवांचे जगणे सुलभ व्हावे, त्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. बलवडी येथे प्रचार दौऱ्यादरम्यान चिणके ता. सांगोला येथील बौद्ध समाजातील शेकडो तरुणांनी एकमुखी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

गेल्या एक महिन्यापासून शेतकरी कामगार पक्षासह शहाजीबापू गटासह शेकापचे हजारो कार्यकर्ते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना बलवडी येथे प्रचार सभा संपल्यानंतर चिणके येथील बौद्ध समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याशी संवाद साधून आपण जाती-पातीपेक्षा समाजातील सर्व घटकांना समान संधी देत केलेल्या विकास कामांमुळे पाठिंबा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले.

गेली ३० ते ३५ वर्षे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी निस्वार्थी भावनेने सांगोला तालुक्यातील जनतेची सेवा केली आहे. उपेक्षित आणि वंचितांना फक्त दिपकआबा साळुंखे पाटील हेच न्याय देऊ शकतात असा विश्वास शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी चंचल बनसोडे, विजयदादा येलपले, विनायक मिसाळ, चंद्रकांत चौगुले, अवि देशमुख, मोहसीन तांबोळी, समाधान शिंदे, संभाजी हरीहर, योगेश वलेकर, संजय गाडे, बाळासाहेब शिंदे, विनायक मिसाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

————–

समाजातील वंचित, उपेक्षित, दीनदलित, गोरगरीब, अठरापगड जाती-जमाती, सर्व धर्माच्या विकासाचे आमचे लक्ष्य असून महाविकास आघाडी उपेक्षित समाजाच्या भक्कमपणे पाठीशी उभी आहे. आयुष्यभर माणुसकीचा धर्म हाच श्रेष्ठधर्म मानून समाजसेवा सुरू आहे. समाजाप्रती असलेले ऋणानुबंध, जनसेवेसाठी मिळालेली संधी या जबाबदारीने कधीच स्वस्थ बसलो नाही. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी तसेच उपेक्षित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहणार असून हेच खरे आत्मसमाधान असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button