बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या तालुक्यातील हजारो तरुणांचा डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आमदार करण्याचा निर्धार
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष अक्षयदादा बनसोडे व सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी शेकापला जाहीर पाठिंबा देत बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांचा डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आमदार करण्याचा निर्धार केला.
बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष अक्षयदादा बनसोडे व आंबेडकरी समाजाचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनी शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख, शेकाप नेते मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, अॅड.शंकर सरगर, बालाजी येडगे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोला तालुक्यात मागच्या पाच वर्षापासून वाईट परिस्थिती आहे. सर्वसामान्य घटकांना तालुक्यात न्याय मिळाला नाही.संविधानाने दिलेल्या कायद्याची पायमल्ली ंहजारो वेळा झाली आहे.त्यामुळे सत्ताधार्याविषयी नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता परिवर्तन हवे आहे. परिवर्तनामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल असे वाटत असल्यामुळे सर्वसामान्य जनता शेकापच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. भविष्यकाळात सांगोला तालुक्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जपला पाहिजे. तो विचार घेऊन अक्षयदादा व बापूसाहेब ठोकळे यांनी व त्यांच्या हजारो तरुण कार्यकर्त्यांनी शेकापला पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्याने माझा ऊर भरुन आलेला आहे. पाठिंबामुळे मला चांगल्याप्रकारे लीड मिळेल असे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले.
बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, मागील पाच वर्षात सांगोला तालुक्यातील आंबेडकरी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. सातत्याने समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. मिलीभगत करून अनेकांनी आपले घरे भरून घेतले आहेत. आणि आता ते लोकांना मत मागण्यासाठी जात आहेत. फक्त राजकारणापुरता वापर करण्याचे काम सत्ताधार्यांनी केले आहे. अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी मी सांगोला तालुक्यातील हजारो आंबेडकरी कार्यकर्त्यांना घेऊन सोबत अक्षय बनसोडे यांच्या बुद्ध भीमराज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला आहे.
यावेळी अक्षयदादा बनसोडे म्हणाले, शेकापच्या लाल झेंड्यामुळे निळ्या झेंड्याला मान-सन्मान मिळेल, असे आम्हाला वाटत असल्यामुळे आम्ही शेकापला जाहीर पाठिंबा दिला आहे.शेवट पर्यंत आम्ही एकनिष्ठ राहणार असून लोकांच्या अंतकरणातील मी दादा आहे. विरोधक दमदाटी करणार असतील तर मी आणि बापूसाहेब ठोकळे पुढाकार घेऊन त्या सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना बहुमताने विजयी करण्यासाठी रात्रीचा दिवस करणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी सांगोला शहरातील मुख्य मार्गावरुन बुध्द भिमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या हजारो कार्यकर्त्यांनी रॅली काढत डॉ.बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला. यावेळी तालुक्यातील हजारो तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
————
आबासाहेबांनी कधीही तालुक्यात जातिय तेड होऊ दिला नाही.स्व.आबासाहेबांनी या तालुक्याची उंची वाढविली असून गोरगरीब जनतेला दमदाटी करुन निवडणुका केल्या नाहीत. या तालुक्यात कोणी दमदाटी करुण निवडणुका करत असेल तर तालुक्यातील सुज्ञ नागरिक निश्चितपणे जागा दाखवतील.
डॉ.बाबासाहेब देशमुख