सांगोला (प्रतिनिधी) – संतोष कणसे यांनी सांगितले असुन आपले कडे एकूण 3 लाख 33 हजार 493 मतदार असून 1 लाख 72 हजार 704 पुरूष मतदार 1 लाख 60 हजार 784 स्त्री मतदार व 5 इतर मतदार असून या साठी 309 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी सांगितले.
घरीबसुन मतदान करणारे 85 वय वर्ष असणारे 659 लोकांनीच 12 डी फॉर्म भरून दिला असून 71 दिव्यांग बांधव यानी होम ओटींग साठी फॉर्म भरला आहे व कांहीनी मतदार केंद्रावर मतदान करणार असल्याचे सांगीतले आहे. होम ओटींग चा कार्यक्रम दिनांक 13 नोव्हेंबर 24 ते 16 नोव्हेंबर 24 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून त्यासाठी 13 रूट तयार केले आहेत सैनिक मतदार 886 असून टपाली मतदार 3000 आहेत ह्यांचे मतदार 3 दिवस अगोदर पुर्ण करण्यात येईल अशी माहिती संतोष कणसे यांनी दिल्याचे मिडीया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली आह.