वंचित बहुजन आघाडीकडून शेकापला जाहीर पाठिंबा

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस दादाशेठ बाबर यांनी दिली. पाठिंब्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी नुकतेच दिले आहे.
253 – सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेकापचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख व वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये झालेल्या समझोत्या नुसार डॉ.बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख कुटुंबीया व शेतकरी कामगार पक्ष सोलापूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सर्वतोपरी मदत करतील आणि सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी डॉ.बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांना मदत करेल यानुसार सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पाठिंबा पत्रात नमुद करण्यात आले आहे.
सांगोला तालुक्यात शेकापच्या विजयाची खात्री झाल्यामुळे अनेक संस्थाकडून पाठिंबा देण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख जोडी नक्कीच सांगोल्यात परिवर्तन करेल असा सर्वसामान्य जनतेला विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे सगळीकडे शेकापचीच मोठी चर्चा सुरु आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा मिळाल्यामुळे विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.



