12 जानेवारी 2023 च्या बैठकीमध्ये आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागणीवरून ११ गावांचा नव्याने समावेश; म्हैसाळ योजनेतील अकरा वंचित गावांचा समावेश करण्यासाठी सर्वेक्षण कामाच्या निविदेस मंजुरी – आमदार शहाजी बापू पाटील

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत म्हैसाळ योजनेमध्ये वाणीचिंचाळे, वाकी घेरडी, जवळा, भोपसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी, उर्वरित पारे, नराळे, सोनंद, घेरडी व डिकसळ या सांगोला तालुक्यातील ११ वंचित गावांचा समावेश करण्याची मागणी 12 जानेवारी 2023 रोजीच्या कार्यकारी संचालक कृष्णा खोरे यांचे सोबत पुणे येथील झालेल्या बैठकीमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती यावेळी कार्यकारी संचालक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने या कामांना मंजुरी देण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले होते यानुसार या अकरा वंचित गावातील 7737.25 हेक्टर जमिनीचा लाभ क्षेत्र विकास कामांकरिता सर्वेक्षण करण्याच्या 56 लक्ष रुपये किमतीच्या निविदेला मान्यता दिली असून एक दोन दिवसांमध्ये या कामाची निविदा प्रसिद्ध होणार आहे सर्वेक्षण व अंदाजपत्रक पूर्ण झाल्यानंतर येत्या तीन-चार महिन्यांमध्ये सुमारे 40 ते 50 कोटी रुपयांच्या कामांना निविदा प्रक्रिये नंतर सुरुवात करण्यात येईल अशीही माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या या अकरा वंचित गावांचा म्हैसाळ योजनेमध्ये समावेश झाला असून काम पूर्ण झाल्यानंतर या गावांमधील 7737.25 हेक्टर जमिनीसाठी शेतीचे पाणी उपलब्ध होणार असल्याने मी खूप समाधानी असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button