तालुक्यात गेल्या 5 वर्षात निकृष्ठ कामे केलेल्या ठेकेदारांचे लायसन्स रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार-डॉ.बाबासाहेब देशमुख

सांगोला:-गेल्या 5 वर्षात टक्केवारीच्या राजकारणामुळे सार्वजनिक ठिकाणची बरीच कामे निकृष्ठ झाली आहे. अशा सर्व कामांची माहिती घेऊन संबंधीत ठेकेदारांना पाठीशी घालणार्या अधिकार्याची चौकशी करुन कारवाई करावी तसेच संबंधीत ठेकेदाराचे लायसन्स रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकासआघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्याप्रचारार्थ गावभेट दौरे सुरु आहेत. आज सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी देवळे, गोडसेवाडी कमलापूर, य.मंगेवडी, अनकढाळ या गावभेटीदरम्यान डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते.यावेळी डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर प्रभाकर माळी, विजय राऊत, डॉ. सुदर्शन घेरडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी तालुक्यात बरीच कामे निकृष्ठ झाली आहेत.याबाबत आपण आवाज उठवावा अशी मागणी केल्यानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले की, बर्याच ठिकाणाहून निकृष्ठ कामांबाबत वारंवार माझेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याची बिले काढली गेली आहेत पण प्रत्यक्षात त्याठिकाणी रस्तेच नाही असेही प्रकार समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या विचाराचे सरकार सत्तेत येणार आहे. त्यामुळे पहिल्याच कॅबिनेटमध्ये सांगोला तालुक्यातील सर्व निकृष्ठ व बोगस कामांची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे.
निकृष्ठ दर्जाची कामे करुन सरकारची फसवणूक केलेल्या संबंधीत ठेकेदारावर कारवाई करुन लायसन्स रद्द करुन काळ्या यादीत टाकण्याची मागणी करत ठेका घेणार्या ठेकेदारांची किंवा कंपन्यांची पाठराखण करणार्या संबंधीत प्रशासकीय अधिकार्यांचीसुध्दा चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाईची मी मागणी करणार असल्याचे सांगत तुमच्या सर्व मागण्या या पुढील काळात पूर्ण करू असे आश्वासन दिले.