महाराष्ट्र

ज्या तालुक्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्य नागरिकासह महिला भगिनी कशा सुरक्षित राहतील ; गाव भेट दौऱ्यात डॉ.अनिकेत देशमुख यांची विरोधकांवर जोरदार टीका

सांगोला:ज्या तालुक्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलीस अधिकाऱ्याचा खून होतो अशा तालुक्यात पोलीस अधिकारीच सुरक्षित नसतील तर महिला भगिनी कशा सुरक्षित असतील असा सवाल उपस्थित करून ६० वर्षात जेवढे खून झाले नाहीत तेवढे खून या पाच वर्षात झाले आहेत. सांगोला तालुका आता गुन्हेगारीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता विचार करण्याची वेळ आलेली असून शांतता, सूव्यवस्था आणि भयमुक्त तालुका करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले.

कमलापूर ता. सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न झाली. यावेळी डॉ. अनिकेत देशमुख बोलत होते. व्यासपीठावर डॉ.बाबसाहेब देशमुख यांच्यासह कमलापूर येथील शेतकरी कामगार पक्षाचे व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षामुळे भविष्य काळात सांगोला तालुक्यात महिला सुरक्षित राहतीलच परंतु महिला सशक्तीकरणासाठी शेतकरी कामगार पक्ष काम करेल. नॅशनल बँकांकडून छोट्या मोठ्या उद्योगांसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी प्रयत्न करू. महिलांचे अर्थकरण वाढवण्यासाठी तालुक्यात छोटे-मोठे उद्योग उभा करू असे सांगितले.

कमलापूर हा बालेकिल्ला आहे. आम्ही जेवढा त्रास सहन केला त्यापेक्षा दुप्पट त्रास तुम्ही गेल्या पाच वर्षात आबासाहेबांसाठी आणि शेतकरी कामगार पक्षासाठी सहन केला आहे. त्यामुळे कमलापूर येथील बहाद्दर कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असून तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी या पुढील काळात आम्ही दोन पाऊले पुढे राहू असा विश्वास देत पूर्वी सारखा पुरोगामी विचारांचा तालुका म्हणून पुढे यायचं असेल तर निवडणूक होईपर्यंत रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. 2019 चे आम्ही अधिकृत उमेदवार असताना तुम्ही विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसला त्यामुळे निष्ठा, तत्वे हे आम्हाला तुम्ही सांगू नये असा टोला लगवत सांगोला तालुका तुम्हाला कधी ही माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळात जनता नक्कीच उत्तर देईल असे सांगत शेतकऱ्यांचे, महिलांचे, आरोग्याचे, शैक्षणिक प्रश्न सोडवून घ्यायचे असतील तर डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना बहुसंख्येने विजयी करा असे आव्हान शेवटी डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button