श्रीधर कन्या प्रशाला नाझरे ची कु.उमा रामचंद्र जांभळे एस.एस.सी. परीक्षेत 98.60% गुण मिळवून तालुक्यात प्रथम

मार्च 2024 मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉलेज नाझरे चे घवघवीत यश. प्रशालेची विद्यार्थिनी कु. उमा रामचंद्र जांभळे हिने 98.60 टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
प्रशालेचा निकाल 86.49 टक्के तर सेमी विभागाचा 100 टक्के लागला आहे. प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी कु.स्नेहा शिवाजी पाटील 96.20 टक्के, पाटील समर्थ तमन्ना 95.20 टक्के, शेख रेहान सिकंदर 95 टक्के, डोंगरे समर्थ गणेश 91.80 टक्के कु. आलदर ऋतुजा पोपट 91.20 टक्के, बंडगर पृथ्वीराज रविराज 90.80 टक्के गुण मिळवूण यशस्वी झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव श्री. मुकुंद पाटील सर, उपाध्यक्षा यमुनाताई पाटील, संचालिका सौ. सितादेवी चौगुले- पाटील, प्राचार्या सौ. यास्मिन मुल्ला मॅडम, पर्यवेक्षक श्री.शहाजहान मुलाणी सर तसेच सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले. प्रशालेच्या या यशाचे ग्रामीण भागातून कौतुक होत आहे.