माणदेश महाविद्यालयास बी.एससी व बी.सी.एस कोर्सला महाराष्ट्र शासनाची मान्यता
जुनोनी येथील माणदेश महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ पासून बी.एससी व बी.सी.एस ( बी.एससी इ.सी.एस. ) या दोन कोर्सना महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. बी.एससी. भाग १ व बी.सी.एस. भाग १ या वर्गांना प्रवेश देणे चालू आहे. माणदेश महाविद्यालय हे सांगोला,जत, कवठेमंहाकाळ व आटपाडी या तालुक्यांच्या सीमेवरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात महत्वाचे योगदान देत आहे.
सन २००९ साली कै.आ. भाई गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची स्थापना झाली असून, गेली पंधरा वर्षे कला शाखा सुरू आहे. शैक्षणिक,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुयश प्राप्त केले आहे. सन २०२३ मध्ये ‘ नॅक ‘ मूल्यांकन होऊन महाविद्यालयास ‘ बी ‘ ग्रेड मिळाली आहे. बी.एससी.भाग १ व बी.सी.एस.भाग १ या वर्गांसाठी शासनाची मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची चांगली सोय झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष मारुतीआबा बनकर,उपाध्यक्ष माजी प्राचार्य सुब्राव बंडगर, सचिव बाळासाहेब एरंडे,शेकापचे ज्येष्ठ नेते व संस्था सदस्य चंद्रकांतदादा देशमुख,संस्थेचे सर्व संचालक,महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.बी.आर.फुले, प्राचार्य डॉ. टी. एन. लोखंडे,प्रभारी प्राचार्य प्रा. मुकुंद वलेकर,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. बी.एससी व बी.सी.एस. कोर्सला शासन मान्यता मिळाल्यामुळे जुनोनी परिसरातील पालक व विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.