सह्याद्रीत रंगला भक्तीचा मळा… विद्यार्थ्यांनी अनुभवला वारीचा सोहळा

आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्राच्या परंपरेत अतिशय महत्त्वाचा दिवस मानण्यात येतो. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरच्या आषाढी वारीची ओढ सर्व भक्तांना लागून राहिली आहे .यंदा 17जुलैरोजी आषाढी एकादशी आहे .महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हरिनामाचा गजर करीत ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपुरात पायी चालत येतात .महाराष्ट्रातील हिच परंपरा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल ने आपल्या प्रांगणात दिंडी कार्यक्रम आयोजित केला होता.
विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत आपली उपस्थिती नोंदवली तर शिक्षकांनीही पारंपारिक वेशभूषा केली होती. जणू वैष्णवांचा -भाविकांचा मेळाच सह्याद्रीमध्ये अवतरला होता .विद्यालयातील वातावरण पूर्ण विठ्ठलमय झाले होते.ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या गजराने
परिसर दुमदुमून गेला होता .सह्याद्रीच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी रिंगणाचा सोहळा अनुभवला. दिंड्या पताका वैष्णव नाचती
पांडुरंगाची या त्रिभवनात कीर्ती असे पारंपारिक बोल बोलतच हरिनामाचा गजर करत काळाची गरज ओळखून सध्याच्या ज्वलंत प्रश्नावरही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केले देशाचे व आरोग्याचे रक्षण करावे, समाजाने स्वच्छता ठेवावी, प्लास्टिक बंदी ,साक्षरता
,पर्यावरण वृक्षसंवर्धन ,प्रदूषण इत्यादी सामाजिक संदेश देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप कुमार इंगवले सर हे स्वतः बालचमुंचे कौतुक करण्याकरता उपस्थित राहिले.व्यवस्थापिका सौ. अनिता इंगवले मॅडम कार्यक्रमाला उपस्थित होत्या .दिंडी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. प्रमोदिनी जाधव तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.शोभा मोरे त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मेथवडे येथीलपालक श्री बबलू कांबळे हे अत्यंत उत्साहाने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले व त्यांनी त्यांच्यातर्फे विद्यार्थ्यांनाखाऊ वाटप केल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.