न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक प्राथमिक विद्यालयामध्ये बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न

अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये लहान मुलांचा बालदिंडी सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला.
या सोहळ्याच्या निमित्ताने पालखीचे पूजन विद्यालयाचे संस्था सचिव व मार्गदर्शक मा. श्री.विठ्ठलरावजी शिंदे सर व पूर्व प्राथमिक व प्राथमिक चे मुख्याध्यापक मा. श्री.दिनेश शिंदे सर यांच्या हस्ते संपन्न झाला.त्यानंतर सुंदर अशा पद्धतीने मुलांनी *”विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”* चा गजर करत ताल धरला.
विद्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये विठुरायाचा गजर करत विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा पार पाडला. यानंतर बालदिंडी ही विठुरायाचा गजर करत माऊली मंदिराकडे गेली.त्या ठिकाणीही विठुरायाचा गजर करत मुलांनी वातावरण अगदी आनंदमय आणि भक्तीमय केले. या भक्ती रसामध्ये मुले आणि पालक अगदी तल्लीन झाले होते .यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला व परत एकदा विठुरायाचा गजर करत बालदिंडी पुन्हा विद्यालयामध्ये आणण्यात आली
या बालकांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी पालक वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी विद्यालयातील पूर्व प्राथमिकच्या शिक्षका सौ. माधुरी जाधव ,सौ .अश्विनी दौंडे तर प्राथमिकच्या सौ.योगिता तरकसबंद सौ.दिपाली तोडकरी , सौ.सविता गोसावी व श्री.आण्णासाहेब इमडे सर शिक्षकेतर कर्मचारी हिना मुलानी उपस्थित होते.