फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्षाची पालक सभा संपन्न

सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रथम वर्षाची पालक सभा संपन्न झाली.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर या श्री .तानाजी शिंदे व सौ.रंजना बाबर या पालकांची पालक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रथम वर्ष विभागाचे विभागप्रमुख प्रा.अनिल वाघमोडे यांनी विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम ,प्राणायाम ,विषयवार चाचणी परीक्षा ,यांची माहिती दिली.पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या संख्येशिवाय महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता देणे अशक्य असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांच्या १०० टक्के हजेरी साठी महाविद्यालयास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांनी पालकांच्या संस्थेकडून असणाऱ्या शैक्षणिक अपेक्षा पूर्ण करण्यास संस्था सदैव कटिबद्द असल्याचे सांगितले.प्रारंभी महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या घटक चाचणी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या व १०० टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या पालक सभेस पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा .नागेश लेंगरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा संगीता खंडागळे यांनी केले.