महाराष्ट्र

भाळवणी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध-आम. शहाजीबापू पाटील

सांगोला /प्रतिनिधी: राज्यातील महायुती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी दिल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोठे यश आले. माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी व भाळवणी गटासाठी मोठी एमआयडीसी तसेच मोठमोठ्या कंपन्या आणून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण करायचे आहे . जिहे-कटापूर योजनेतून 1 टीएमसी पाणी या भागाला मंजूर केले आहे. निरा उजवा कालव्याचे मिळणारे पाणी या दोन्ही योजनेतून भाळवणी गटाला बारमाही पाणी मिळेल. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटात विविध प्रकारची विकासकामे मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहेत .भविष्यात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाळवणी गटातील विविध गावात निवडणूक प्रचारादरम्यान व्यक्त केले.

यावेळी शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजीराव बाबर , युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल, युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, प्रा. मारुती जाधव ,नवनाथ माने,सत्यवान देवकुळे, सुधाकर भिंगे, अमोल इनामदार, नानासाहेब मोरे ,भगवानराव चौगुले, शिवकुमार फाटे ,संजय मेटकरी, शकुंतला चौगुले, तानाजी देशमुख ,वसंत चंदनशिवे, पांडुरंग हाके, मारुती जाधव, बाळासाहेब यलमार, शहाजी मोहिते, दत्तात्रय नागणे ,बिभीषण पवार ॲड. सुधाकर गाजरे आदी महायुतीचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते व मतदार बांधव उपस्थित होते.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख म्हणाले,येत्या वर्षभरात सांगोला तालुक्याचे व भाळवणी गटाचे नंदनवन होणार आहे. या भागात शहाजीबापू पाटील यांनी अनेक प्रकारची विकासाची कामे केली आहेत. लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण महत्वकांक्षी आहे .त्यामुळे विजयाचा गुलाल हा आपलाच आहे. राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल व आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळेल असा ठाम विश्वास श्रीकांतदादा देशमुख यांनी व्यक्त केला. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी गटात आयोजित केलेल्या कॉर्नर सभेदरम्यान श्रीकांतदादा देशमुख बोलत होते .

चौकट: सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी गटातील गार्डी, लोणारवाडी, तिसंगी ,सोनके, पळशी, सुपली, उपरी ,खेडभाळवणी, शेळवे या गावातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा व मतदार बंधू-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला . भाळवणी गटातून आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मताधिक्य देवू असे या भागातील महायुतीच्या नेतेमंडळींनी सांगितले. या भागातील नद्या वरती स्वयंचलित बंधारे बांधले जातील. भाळवणी गटातून पांडुरंग परिवार व चंद्रभागा परिवाराने शहाजीबापूंना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button