महाराष्ट्र

बंडगरवाडी (चिकमहूद) येथील कार्यकर्त्यांचा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

बंडगरवाडी (चिकमहूद) येथील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. दररोज शेकडो कार्यकर्ते दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने सांगोला तालुक्यात शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघावर उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकवणारच असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.

बंडगरवाडी (चिकमहूद) ता.सांगोला येथील दत्ता बंडगर, सोमनाथ बंडगर, प्रकाश बंडगर, विनोद लवटे, मायाप्पा पडळकर, समीर बंडगर यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, युवक नेते यशराजे साळुंखे पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, युवासेनेचे तालुकाप्रमुख सुभाष भोसले, आनंद फाटे उपस्थित होते. यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याची ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button