कोळा येथे डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिता देशमुख सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळा संपन्न
डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद-प्रा.पी.सी.झपके

कोळा (वार्ताहर):-आशिया खंडामध्ये शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असणार्या रयत शिक्षण संस्थेवर डॉ बाबासाहेब देशमुख यांची जनरल बॉडी सदस्य पदी निवड झाल्याने फार गौरवाची बाब असुन सांगोला तालुक्याचे फार मोठे भाग्य आहे त्यांचे अभिनंदन करतो. डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे समाजसेवेचे सामाजिक कार्य चांगले कौतुकास्पद असल्याचे विचार सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.पी.सी.झपके सर यांनी व्यक्त केले.
कोळा ता.सांगोला येथे रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी डॉ.बाबासाहेब देशमुख तसेच डॉ निकिताताई देशमुख यांचा नागरी सत्कार कोळा जिल्हा परिषद गट सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने श्री श्री श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती कोळेकर महाराज यांच्या शुभहस्ते प्रा.पी.सी.झपके यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रा.झपके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कोळा नगरीचे आराध्य दैवत श्री.श्री.श्री.रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी होते.
पुढे बोलताना प्रा पी सी झपके सर म्हणाले डॉ बाबासाहेब देशमुख यांना रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रांमध्ये कार्य व काम करण्याची चांगली संधी मिळाली आहे रयत सारख्या एका मोठ्या संस्थेमधील अनुभव आपल्याला सर्वांना मिळणार आहे. ज्या अनुभवामुळे सांगोला तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रगतीसाठी निश्चितपणे हातभार लागेल. सर्वपक्षीय नागरी सत्कार ग्रामस्थांच्या वतीनं होणे फार कमी लोकांच्या नशिबात असते, डॉ बाबासाहेब देशमुख व डॉ निकिता देशमुख यांना मिळाले. यांच्या नागरी सत्काराच्या सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आलेले सर्वपक्षीय सर्व नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थांनी सत्काराचे आयोजन करून चांगले कार्य केले आहे, असे शेवटी प्रा.पी.सी.झपके यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कोळा नगरीचे आराध्य दैवत श्री श्री श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती कोळेकर महाराज म्हणाले, डॉ.बाबासाहेब देशमुख यांची रयत शिक्षण संस्थेवर निवड झाली त्यांना अभिनंदन करतो. आशीर्वाद देतो मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. संस्थेचे महत्त्वाचे एक ब्रीद वाक्य आहे, अंधश्रद्धेला थारा नाही, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रबोधन केले, लोकांनी सांगितलं तुम्ही मला भिक्षा द्या मी तुम्हाला ज्ञान देतो, तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख होणारं नाही याचं ज्ञान देतो, शिक्षणाने दुःख होत नाही शरीर आणि मन सुदृढ वाटतं ते आहारावरती अवलंबून असतं.,असे श्री.श्री.श्री.रुद्रपशुपती कोळेकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.निकिता देशमुख, शेकाप चिटणीस मंडळाचे सदस्य बाबासाहेब कारंडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.
प्रारंभी सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीस स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करून सुरुवात झाली.यावेळी सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी वर संचालक पदी निवड झाल्याबद्दल राजमाता पतसंस्थेचे चेअरमन कुंडलिक आलदर, उद्योगपती दिलीप देशमुख, महूदचे संतोष पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न झाला.
या कार्यक्रमास कोळा जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय नेतेमंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.