शैक्षणिक

स्वेरीमध्ये ‘राष्ट्रीय एकता दिवस’ उत्साहात साजरा

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व स्वेरीचा ‘रासेयो’ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय एकता दौड’ मॅरेथॉन उत्साहात संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये भारतातील थोर मुत्सद्दी नेते व पहिले उप- पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ वी जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जीवनकार्याचे महत्व सांगून राष्ट्रीय एकात्मता ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातील विविध पैलू उलगडून दाखवताना देशांतर्गत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे महत्व देखील पटवून दिले. त्यानंतर विद्यार्थी व प्राध्यापकांना ‘राष्ट्रीय एकात्मतेची शपथ’ देवून आपले ध्येय साध्य करताना करिअर करण्यासाठी आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर कठोर परिश्रम हाच यशाचा राजमार्ग असल्याचे त्यांनी कटाक्षाने सांगितले.

‘राष्ट्रीय एकता दिना’चे औचित्य साधून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन (सोलापूर ग्रामीण) व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचा ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय एकता दौड’ मॅरेथॉनचे आयोजन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये केले होते. या ‘राष्ट्रीय एकता दौड’ मॅरेथॉनच्या आयोजनासाठी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील व स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते गोपाळपुर चौक या मार्गावर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘राष्ट्रीय एकता दिन चिरायू होवो’ या घोषणा विद्यार्थी देत होते. या ‘राष्ट्रीय एकता दौड’ मॅरेथॉनमध्ये स्वेरीच्या जवळपास २०० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. तर यातील २१ विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देवून सन्मानित करण्यात आले. ‘राष्ट्रीय एकता दौड’ मॅरेथॉननंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची देखील सोय करण्यात आली होती. ही एकता दौड स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, विद्यार्थी अधिष्ठाता व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

यावेळी प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील, प्रा. यशपाल खेडकर, प्रा.गोडसे, प्रा.सागर सरीक, प्रा. अभिजित चव्हाण, प्रा. स्वप्नील निकम, पो.कॉ. विनायक नलवडे, डिप्लोमा विद्यार्थी ओम हरवाळकर यांच्यासह स्वेरीचे इतर प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!