प्राथमिक शिक्षणाधिकारी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
तक्रारदाराला कार्यालयात बोलावून घेतले २५ हजार रुपये; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जागेवरच कारवाई

सोलापूर : पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी एका स्वयंअर्थसहाय शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. सुट्ट्यांमुळे पैसे द्यायला थोडा विलंब झाला होता. सोमवारी (ता. ३१) तक्रारदाराला कार्यालयात बोलावून त्याच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पुढील कारवाई केली जात आहे.लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
झेडपीच्या प्राथमिक शाळांची स्थिती सुधारण्याच्या बाता मारत शिक्षकांना उपदेशाचे धडे देण्यामुळे शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत होते. त्यांच्याविरूध्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे अनेक शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी स्वामी यांनी लोहार यांना नोटीस काढून काहीही न बोलण्याचा सल्ला दिला होता.