सांगोला:- महाविकास आघाडी व इंडिया अलायन्स चे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची सांगोला तालुक्यात मोठी क्रेज तयार झाले आहे. विशेषता तरुण वर्ग डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असून रात्रंदिवस प्रचारांमध्ये काम करत आहे. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयी निश्चित असल्यामुळे तालुक्यातील विरोधी पक्षाला मोठे धक्के बसत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षांमध्ये पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत असून याचा फायदा निश्चितच विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नाझरे व धायटी गावातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शहाजीबापू व दीपक आबांना धक्का देत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला
नाझरे येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिलीप बनसोडे यांनी उबाठा गटातून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचप्रमाणे धायटी येथील माजी उपसपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोहन गणपत सरगर यांनी शिंदे गटातून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
आम्ही प्रस्थापितांच्या कार्यप्रणालीला वैतागलेलो असून सांगोला तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने सांगोला तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने चांगले नेतृत्व तयार होत आहे. डॉक्टर बाबासाहेब देशमुख सारखा स्वच्छ चरित्र, उच्चशिक्षित, ध्येयवेडा तरुण राजकारणात आलेला असून गेल्या तीन वर्षातील सामाजिक कार्याने आम्ही भारावून गेलो आहोत.त्यामुळे येणाऱ्या कालावधीत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करणार असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.