सावे माध्यमिक विद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत कार्यक्रम संपन्न

सावे माध्यमिक विद्यालयात दिनांक 15 जून रोजी शैक्षणिक वर्ष 2024- 25 या वर्षांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता आठवी, नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावे ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच श्री शिवाजी वाघमोडे, नूतन ग्रामपंचायत सदस्य श्री वसंत रड्डी उपस्थित होते. सर्वप्रथम शिवाजी वाघमोडे व वसंत रड्डी यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.त्यानंतर इयत्ता आठवी, नववी व दहावी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत लोकनियुक्त सरपंच शिवाजी वाघमोडे व नूतन ग्रामपंचायत सदस्य श्री वसंत रड्डी यांच्या हस्ते गुलाब फुल , चॉकलेट व पाठ्यपुस्तक देऊन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांनी केले.



