महाराष्ट्र

प्रा. झपके सरांच्या वाढदिवसानिमित्त लोणविरे येथे 135 जणांचे रक्तदान

नाझरा (वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झपके सर यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त लोणविरे येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 135 जणांनी रक्तदान केले. यामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता.

लोणविरे हायस्कूल येथे सरपंच मालतीताई अजित गायकवाड यांच्या हस्ते व कॅप्टन बाळासाहेब रामचंद्र गायकवाड यांचे हस्ते त्रिफळ वाढवून व फीत कापून शिबिराची सुरुवात करण्यात आली. लोणविरे हायस्कूल सचिव विलास माने , अध्यक्ष सुनील पाटील,नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक बी एस माने , कोळा विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे, माजी सरपंच रघुनाथ भजनावळे, अक्षय ब्लड बँक सोलापूर चे संजय कुमार शिंदे,उदय पाटील, मेजर संतोष गायकवाड, चेअरमन लक्ष्मण मोरे, विष्णू गायकवाड, अजित गायकवाड, कुंडलिक गाडेकर, मधुकर मोरे, शिवाजी आदलिंगे, मेजर विक्रम माने यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
सदर रक्तदान शिबिरास सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, उद्योगपती नाना क्षीरसागर,सांगोला विद्यामंदिर चे प्राचार्य अमोल गायकवाड, लायन्स क्लबचे पदाधिकारी नरेंद्र होनराव,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, सुरेश मस्तुद,प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, सी.डी. जगताप, ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील,वरिष्ठ लिपिक हेमंत नलवडे, सुनील भोरे, यांनी सदिच्छा भेट देत रक्तदान आयोजनाबाबत कौतुक केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्रा. नारायण पाटील, सोमनाथ सपाटे,शिवराज रायचुरे यांच्यासह लोणविरे हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button