सांगोला(प्रतिनिधी):- कृषीरत्न महिला अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसा.लि.सांगोलाच्या चेअरमनपदी सौ.कोमल संदीप सुरवसे यांची तर व्हा.चेअरमनपदी सौ.साधना रमेश अनुसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कृषीरत्न महिला अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसा.लि.सांगोलाच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदांच्या निवडीसाठी काल सोमवार दि.19 मे रोजी संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चेअरमनपदी सौ.कोमल संदीप सुरवसे यांची तर व्हा.चेअरमनपदी सौ.साधना रमेश अनुसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बैठकीप्रसंगी संचालिका सौ.पल्लवी सुधीर सुरवसे, संचालिका सौ.संगीता पोपट केदार, संचालिका सौ.सुनिता सुर्यकांत सावंत, संचालिका सौ.अश्विनी अमोल माने, संचालिका सौ.साधना संतोष जरे, संचालिका सौ.लक्ष्मी तानाजी सुरवसे, संचालिका सौ.वनिता विजय चव्हाण, संचालिका सौ. अश्विनी अमोल बोत्रे, संचालिका सौ.सोनाबाई बबन पाटील आदी उपस्थित होते.
निवडी नंतर चेअरमन सौ.कोमल संदीप सुरवसे, व्हा.चेअरमन सौ.साधना रमेश अनुसे यांच्यासह सर्व नूतन संचालक मंडळाचा सत्कार समारंभ संपन्न झाला. संस्थेच्या पदाधिकार्यांना, महिला सभासदांना विश्वासात घेऊन यापुढील काळात कामकाज करु असे सांगत चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी निवड केल्याबद्दल चेअरमन सौ.कोमल संदीप सुरवसे, व्हा.चेअरमन सौ.साधना रमेश अनुसे यांनी सर्वांचे आभार मानले.