सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 1281 पोस्टल मतदान
253सांगोला विधानसभा मतदारसंघात तहसील कार्यालयात दिनांक 12/11 ते 18/11/24 रोजी पर्यत एकूण 1281 मतदान पूर्ण झाल्याचे आहे त्यामध्ये सांगोला 975,जिल्ह्य़ातील 200 व जिल्ह्य़ाबाहेरील 106 मतदान झाले आहे . दिनांक 12/11/24 पासुन सांगोला तहसील कार्यालयात पोस्टल मतदान सुरू झाले होते
पोस्टल मतदान करण्यासाठी तहसील कार्यालय येथे पोस्टल मतदान साक्षांकन करण्यासाठी राजपत्रित अधिकारी वसंत फुले सहाय्यक गटविकास अधिकारी व प्रकाश नलवार उपनिबंधक यांची नेमणूक केली आहे तसेच मतदान केंद्राध्यक्ष संतोष लोंढे व सुभाष रोकडे तसेच मतदान अधिकारी उत्तम नवले यांची नियुक्ती केले असून त्या ठिकाणी 253 विधानसभा साठी 1 व जिल्हा अंतर्गत विधानसभा साठी 1 व जिल्हा बाहेरील विधानसभा साठी 1 मत मतपेटी ठेवलेल्या आहेत या ठिकाणी आज एकूण 1281 मतदारांनी मतदान केले आहे टपाली मतदान दिनांक 19/11/24 पर्यंत कार्यालयीन वेळेत करण्यात आले होते आज सांगोला 253 साठी 1281 मतदारांनी टपाली मतदान हक्क बजावल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे.
वयोवृद्ध व दिव्यांग बांधवांसाठी घरी बसून मतदान केलेले एकूण मतदार 706 लाभार्थी आहेत त्यामध्ये 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे 635 मतदार असून 71 मतदार दिव्यांग बांधव आहेत या मोहिमेसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी नोडल अधिकारी दिपाली जाधव मॅडम यांनी काम पाहिले आहे
आजअखेर पोस्टल मतदान 1281 झाल्याचे व दिव्यांग बांधव यांचे 706 मतदान झाल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे