महाराष्ट्र

आलदर हॉस्पिटल मध्ये जन्मानंतर रडले नसलेल्या नवजात बालकावर  यशस्वी उपचार

आलदर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सांगोला तालुक्यातील नवजात बालकावर मोफत उपचार करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून प्रसूती नंतर बाळाचा श्वास गुदमरल्यामुळे बाळ रडले नाही , डॉ महावीर आलदर यांनी त्वरित ऑक्सीजन प्रक्रिया करून बाळाला एम्बुलेंस मधुन आलदर हॉस्पिटल नवजात शिशू अतिदक्षता विभाग मधे दाखल केले . बाळावर ७ दिवस यशस्वी उपचार करून डिसचार्ज करण्यात आले. सर्व उपचार आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत करण्यात आले आहेत.

डॉ. महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिस्चार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला.नातेवाईकांना जेवण, औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत व उत्तम देण्यात आल्यामुळे नातेवाईकांनी आलदर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले.तरी सर्व गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आलदर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button